Monday, October 5, 2009

एक रात्र अशीही..

मित्र-मैत्रीनि सोबत एक रात्र, स्वप्नातली।बाहेर जेवण, नऊ ते बारा पिक्चर,नंतर चालत सारस बागे जवळ मस्त गरमागरम कॉफी,ती ही दोन कप.गरम कॉफी बरोबर गरम विषय,चर्चा तर कधी वाद.रात्रीचा गार वारा,ढगाळ आभाळ , धूसर दिसणारा चंद्र, शांत आणि ओले रस्ते, बंद दुकानं आणि आमच्या गप्पा. कधी येणारी डुलकी.एकमेकांची घेतलेली काळजी.संपता न संपणारे विषय.कधी काही गंभीर तर कधी चेष्टा,कधी भूतकाळातल्या आठवणी तर कधी भविष्याच्या गोष्टी. कधी हि न बोललेले विषय, न उलगडलेली मने, सगळ मोकळ करणारी रात्र. संपत आलेली पण तरीही बरच बोलायचं राहून गेलेली रात्र.

2 comments:

  1. खूपच आवडलं. google transliteration वापरून पाहा. (थोडंसं व्याकरण). मस्त झालंय. लिहीत राहा.

    ReplyDelete
  2. धन्यवाद.trnsliteration च वापरतेय, सुधारणा होत राहतील,अशी अपेक्षा आहे.

    ReplyDelete

About Me

My photo
short tempered,talkative.love to watch tv.