Monday, October 5, 2009

आठवण

तेंडूलकरच 'तें दिवस' वाचून आमची कॉलनी आठवण थोडस स्वाभाविक होत.

आमची कॉलनी. चार मोठ्या घरांच्या तीन रांगा,अशी एकून बारा घर.सगळी 'सायबांची'.पंचायत समितीमध्ये काम करणारे साहेब.सगळे साहेब कामाला गेले कि कॉलनीत आम्हा मुलांचे आणि बायकांचेच राज्य. सायबांच्या बायका. मध्यमवर्गीय,काही कमी शिकलेल्या,काही अजिबात न शिकलेल्या,नवरयाच्या नोकरीत आणि मुलांच्या मार्कांमध्ये सुख शोधणाऱ्या बायका. भाज्या खुडायला,धान्य निवडायला,लहान-सहान सण साजरे करायला आणि सल्ले मागायला-द्यायला नेहमी एकत्र. नवा पदार्थ बनवला तर सगळ्या घरांमध्ये देणाऱ्या. संध्याकाळी मात्र नवरा घरात आला कि घरातून बाहेर न पडणाऱ्या.'सुखी 'बायका.

आम्ही मुल.शाळेत नाहीतर कॉलनीत रस्त्यांवर खेळात मग्न.शाळा घरापासून हाकेच्या अंतरावर.शाळेत प्यायचं पाणी संपल कि आम्ही कॉलनीत पाणी प्यायला यायचो,इतक्या जवळ शाळा.म्हणून आम्ही खऱ्या अर्थान कॉलनितच असायचो.दिवसभर. प्रशस्त जागा असल्यान आम्ही खूप खेळायचो.विष-अमृत,वक्वास,लपंडाव,पळापळी,लगडीपळती,घर आखून जिबलीन, क्वचित कधीतरी क्रिकेट(मुलीना एक दोन बॉलमध्ये औट करून फिल्डिंग करायला लावलं जायचं) यातून वेळ मिळाला कि जेवण-पाव्हण खेळायचो,मुल-मुली मिळून.('भातुकली' हा शब्द खूप नंतर कळाला) बैठे खेळ अजून वेगळे.इतक खेळून अभ्यास करून चांगलेच मार्क मिळवावे लागायचे, कारण सायबांच्या मुलांना कमी मार्क असण,हा खूप मोठा गुन्हा होता. आणि नापास होण तर......

3 comments:

  1. आज जास्त लक्ष देऊन पोस्ट वाचली. आतापर्यंतच्या पोस्टमधली मला सगळ्यात आवडलेली पोस्ट. तुमच्या 'आठवणी' पुढेही वाचायला आवडतील. जरा ह्या पोस्टला थोडंसं पॉलिश पाहिजे असं वाटलं. (की अति पॉलिश नसल्यामुळे ती अधिक चांगली वाटतेय?)

    ReplyDelete
  2. खूप छान वाटल.अनपेक्षित अशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. पॉलिश करायचं म्हणजे काय ते नाही समजल. 'आठवणी'ची अडचण अशी कि थांबायचं कुठ हे कळत नाही.बघू,काही तसच सुचल तर लिहीन

    ReplyDelete
  3. 'आठवणींची अडचण अशी की कुठे थांबायचं ते कळत नाही.'
    ही अडचणसुद्धा मजेशीर आहे ना? आनंद देते.

    ReplyDelete

About Me

My photo
short tempered,talkative.love to watch tv.