Tuesday, December 29, 2009

किम की ड्यूक

अर्धविराम. खरतरं थोडा लांबलेला अर्धविराम. असो. कधीपासून कोल्हापुरात झालेल्या आशियायी चित्रपट महोत्सवात पाहिलेल्या चित्रपटांविषयी लिहायचं होतं. '३ आयर्न' आणि 'द बो', हे दोन कोरियन चित्रपट. किम कि ड्युक नावाच्या दिग्दर्शकाचे. मी काही चित्रपट समीक्षक नव्हे पण समर नखाते यांच्यामुळे चित्रपट बघण्याची जी नवी सुधारित दृष्टी मिळालेली आहे त्यामुळे आवडलेलं का आवडलं आणि जे पाहिलं त्यात वेगळं काय वाटलं हे नक्कीच सांगता येतं. त्यामुळंच हे दोन्ही चित्रपट वेगळे वाटले, अर्थात भारतीय चित्रपटांच्या संदर्भात. तर, या दोन्ही चित्रपटात, अगदी सहज मोजता येतील इतके कमी संवाद, आवश्यक असतील तिथेच संवाद. ('द बो' मधील नायिका संपूर्ण चित्रपटात एकदाही बोलत नाही, मूक नसताना. ) पार्श्वसंगीत ही असेच मोजके. पात्रांची संख्याही खूप कमी आवश्यक तितकीच.(३ आयर्न मध्ये तिघेच जण आहेत.) पण तरीही सिनेमा कुठेच संथ वाटत नाही कारण प्रचंड बोलके सीन आणि दमदार अभिनय विशेषतः मुद्राभिनय दाद देण्यासारखा ('द बो' मधील म्हातारा). आता हि कमाल कलाकारांची ही असू शकते पण चित्रपट ज्या प्रकारे पुढे जातो त्यावरून दिग्दर्शकाची ताकदही लक्षात येते. 'द बो' मध्ये ७० वर्षांच्या म्हाता-याला १६ वर्षांच्या मुलीशी लग्न करायचे असते (हिंदी 'निशब्द'शी तुलना करण्याचं धाडस आणि मूर्खपणा केला नाही.) ही कथा ज्या सशक्तपणे पडद्यावर मांडलीय ती सांगण्यापेक्षा पहिलेलं अधिक उत्तम, हे एक उदाहरण. कलाकारांची फौज, अनावश्यक गाणी, कर्कश पार्श्वसंगीत असे हिंदी चित्रपट पाहिल्यानंतर, असे चित्रपट नक्कीच वेगळे वाटले आणि मांडणीच्या शैलीमुळे आवडलेही.

12 comments:

  1. 'अर्धविराम' वगैरे: अगदी साहित्यिक स्टाईलमध्ये लिहिलंयस. bloggingशी रूळलीस असं दिसतंय, ते एक चांगलं झालं.
    'आशियायी चित्रपट महोत्सव': तुला आवडलेल्या पिक्चरांबद्दल अधिक तपशिलात लिहिलंस तरी चांगलं होईल.

    ReplyDelete
  2. सुगंधाबाई , शुद्ध लेखनाकडे लक्ष द्या . अवधूतनं स्पष्ट न बोलता सुचवलंय तेच सांगते -
    आशियन नव्हे - आशियायी/ आशियाई , जन नव्हे जण इ.

    ReplyDelete
  3. दोन्ही सिनेमे आणि दिग्दर्शकाविषयी अधिक विस्तृतपणे वाचायला आवडले असते.

    ReplyDelete
  4. धन्यवाद अवधूत. ब्लॉग्गिंग आवडायला लागलंय हे खरंच, पण आता वेळ मिळत नाही, पुरेसा.
    स्नेहल, व्याकरणाकडे लक्ष देईनच पण तुही सांगत जा.
    शंभरातल्या शंभराव्या, सूचनेचे स्वागत, नक्की प्रयत्न करीन.
    प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.

    ReplyDelete
  5. जरा भोचकपणा करू का ? comment देताना परत चुका - ' तुही ' नाही ' तूही ' इ .

    ReplyDelete
  6. स्नेहल,खरं सांगायचं तर 'धन्यवाद' म्हणावं कि नको असा प्रश्न पडला, तो पडायला नको, असंही वाटतंय, असो. आधी सांगितल्याप्रमाणे चुका सांगत जा. आता यात काही चूक नाही नं?

    ReplyDelete
  7. भोचकपणा क्र. २ : ' कि' नव्हे की . ( आता विचारलयचं तर कशाला सोडू ? )

    ReplyDelete
  8. > ' कि' नव्हे की .
    >
    बनसोडे बाई : मी तो भोचकपणा करणार होतो; पण 'की' या अव्ययाचे र्‍हस्व रूप वापरलेले चालते, अशी सूट माधवराव पटवर्धनांनी दिली (नोंदवली) आहे. ही मोकळीक पद्‌यरचनेच्या संदर्भात दिली आहे; तरीही सुगंधाबाई इतक्या काव्यात्म लिहितात, तेव्हा मी त्यांना ही सूट मायमराठीत द्‌यायला तयार आहे. हिंदीमौसीत तर मला वाटतं कि (की) दीर्घ 'की' फक्त षष्ठीचा प्रत्यय म्हणून वापरतात : उस की कहानी. इतर सर्व संदर्भात 'कि' वापरल्या ज़ातो. 'सुना है की कल छुट्टी है' चूक आहे, असं वाटतं. त्याची ९९ % खात्रीच आहे.

    - डी एन

    ReplyDelete
  9. धन्यवाद. इतकच लिहिते, नाहीतर यातही चुकायचं काहीतरी.
    नानिवडेकर, 'काव्यात्मक लिहिते' , या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  10. धन्यवाद. इतकच लिहिते, नाहीतर यातही चुकायचं काहीतरी.
    ---

    Anuswaar necessary on 'k' of इतकच .

    ReplyDelete
  11. सुगन्धाबाई : संबोधनानंतर स्वल्पविराम किंवा अर्धविराम वापरण्याची पद्‌धत अनेक लोक पाळत नाही. तुम्ही 'अवधूत, धन्यवाद' असल्या रचनेत ती पाळता, हे उत्तम आहे. पण 'धन्यवाद अवधूत' या वाक्यातही दोन शब्दांत स्वल्पविराम हवा.

    'कार्यक्रमाला पु ल देशपांडे, त्यांच्या पत्नी सुनीताबाई, आणि मातोश्री लक्ष्मीबाई उपस्थित होते', हे वाक्य सर्रास 'कार्यक्रमाला पु ल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी, लक्ष्मीबाई देशपांडे उपस्थित होते' असलं लिहिल्या ज़ातं. (इथे अर्थात संबोधनाचा संबंध नाही.) त्याचा अर्थ लक्ष्मीबाई पुलंच्या पत्नी आहेत असा होऊ शकतो. 'पु ल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी, लक्ष्मीबाई देशपांडे, वसंतराव देशपांडे उपस्थित होते' याचा अर्थ तर लक्ष्मीबाई पुलंच्या पत्नी आहेत असाच होतो. 'थॅचर काकू, माजी ब्रिटिश पंतप्रधान यांचा या धोरणावर विश्वास होता' या वाक्यात 'पंतप्रधान' शब्दानंतर स्वल्पविराम हवा. एरवी त्याचा अर्थ थॅचर बाई आणि नामोल्लेख न केलेले एक माजी पंतप्रधान असे दोघे त्या धोरणाचे पुरस्कर्ते होते असा अर्थ होऊ शकतो. एखाद्या नावाआधी त्या बद्‌दल काही माहिती (qualifier) असेल आणि त्यानंतर स्वल्पविराम असेल, तर नावानंतरही एक स्वल्पविराम हवा.

    ReplyDelete
  12. sorry im reading your blogs very late.But while reading the comments on blogs i came to see each and every one is just focusing on your grammer, which is neglisible, concerning your thoughts.

    ReplyDelete

About Me

My photo
short tempered,talkative.love to watch tv.