Wednesday, January 13, 2010

जाहिरात

कोल्हापुरात महानगरपालिकेच्या जवळ मोठया बोर्डवरची जाहिरात: 'कोल्हापुरातील पाहिलं बहुभाषिक सायंदैनिक, कधी कधी वाकेन, पण मोडणार नाही, हा मंत्र युवकांना शिकवणारं, आजची बातमी आजचं देणारं, महाराष्ट्र वैभव.' या दैनिकाच्या शंभराव्या अंकाचं प्रकाशन नुकतंच मनोहर जोशी यांच्या हस्ते झालं. यावेळी कोल्हापूरातले शिवसेनेचे दोन आमदारही उपस्थित होते.

11 comments:

  1. सुगंधाबाई : तुमच्या पोस्टचा रोख कळला नाही. ही बातमी तुम्ही नक्की का इथे कळवली? 'बहुभाषिक' स्वरूपाचं पहिलं दैनिक गावात निघालं म्हणून? 'कधी कधी वाकेन ...' वगैरे संदेश तुम्हाला आवडला / नावडला / गमतीदार वाटला म्हणून?

    'आजची बातमी आजचं देणारं' -> 'आजच' मधे च-वर अनुस्वार नको. 'देणारे', 'म्हणायचेच होते' या शब्दांच्या औपचारिक रुपांतला ए-कार जेव्हा अनौपचारिक संदर्भात गाळल्या ज़ातो, तेव्हा 'देणारं', 'म्हणायचंच होतं' असं त्या शब्दांचं बोलीतलं रूप लिहिल्या ज़ातं. शब्दावरचा ज़ोर / भर / आघात दर्शवण्यासाठी अनुस्वार वापरणं चूक आहे.

    तुमच्या एकाच ज़ुन्या पोस्टमधे तुम्ही परिच्छेद वापरलेत. एरवी सगळं एका दांडपट्ट्यात. तुम्ही प्रयत्न केलात तर (सध्याच्या बर्‍यापैकी पातळीपेक्षाही) खूप चांगलं लिहू शकाल, असं वाटतंय. मराठीचा दुरभिमान बाळगणार्‍यांबद्‌दल तुम्ही लिहिलेलं टिपण छान आहे.

    ReplyDelete
  2. तुमच्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद.
    एक जाहिरात वाचली, ती गमतीदार वाटली, लक्षात राहिली, म्हणून इथं नोंदवली. बाकी, अधिक माहिती.
    व्याकरणात चुका आहेत, त्या सुधारण्याचा प्रयत्न करीन. परिच्छेदांचा घोळ होतोय खरा; पण त्यातही हळूहळू सुधारणा होतील.
    बाकी, अशा सूचना देत चला, म्हणजे सुधारायला मदत होईल.
    पुन्हा एकदा खूप धन्यवाद.

    ReplyDelete
  3. त्या जाहिरातीत नक्की काय गमतीदार किंवा नोंदवण्यासारखं आहे? अशा अनेक जाहिराती अनेक लोक अनेकदा पाहत असतील.

    > हळूहळू सुधारणा होतील.
    >
    बरेचदा लिहाल तर सुधारणा होतील. हळूहळू लिहाल तर सुधरायचे प्रसंगच येणार नाहीत. तुमच्यात क्षमता आहे, असं वाटतं. तेव्हा जास्त लिहून बघा. पण (गमतीदार नसलेली) 'गमतीदार जाहिरात' वगैरे विषयांवर नको. शिवसेनेचाही रोज़ निषेध वगैरे नको, बरं का. मी शिवसेनावाला आहे हो. किती लोकांचे किती प्रहार आम्ही सहन करावेत?

    > तुमच्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद.
    >
    या प्रतिक्रियेला तुम्ही बहुतेक खूप खूप शिव्या देणार.

    - नानिवडेकर

    ReplyDelete
  4. एक छोटीशी सुधारणा. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे दोन खासदार नसून आमदार आहेत.

    ReplyDelete
  5. शंभराव्या, मार्गदर्शकांच्या यादीत मनापासून स्वागत. चूक मान्य. सुधारणा होईल. आपली कृपा दृष्टी रहावी.
    नानिवडेकर, तुमच्या भावना दुखावल्या का हो? तसं असल्यास क्षमस्व. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

    ReplyDelete
  6. > नानिवडेकर, तुमच्या भावना दुखावल्या का हो?
    >
    चला, आम्हां शिवसेनावाल्यांनाही दगडफेकीव्यतिरिक्त भावना, म्हणजे दुखावल्या वगैरे जाऊ शकणार्‍या, असतात याची दखल जगानी घेतली हे पाहूनच अगदी भरून आलंय. डोळ्यांतले अश्रू थांबायला तयार नाहीत. हात कसेबसे लिहिताहेत. भरून आलेला गळा मात्र विचार व्यक्त करू शकला नसता. इत्यादि.

    वाचकांच्या भावना वगैरे गेल्या उडत, तुम्ही बिनधास्त लिहीत रहा. तशा तुम्ही 'मार्गदर्शकांच्या यादीत हा तुमचा आठवा नंबर, सातव्या भोचकाच्या मागे आता गुपचूप उभे रहा' असला फटकळपणा मस्त करता आहात. (ही सगळी गंमत बरं का, तेव्हा भौतिकशास्त्राचा पेपर लिहिताना 'Draw diagrams where appropriate' म्हणतात, त्या चालीवर insert smileys where appropriate.)

    आपल्या भाषेवर प्रेम असणं योग्य आहे. पण शिवसेनेचा दुरभिमान, आपल्याच हिंदी (बांधव वगैरे) लोकांचा द्‌वेष करणे हा प्रकार देशाला घातक आहे. म्हणून ते तुमचं ज़ुनं टिपण मला खरंच मनापासून आवडलं होतं.

    ReplyDelete
  7. स्नेहल, अवधूत, नानिवडेकर धन्यवाद.

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

About Me

My photo
short tempered,talkative.love to watch tv.